Bail Pola Festival 2021 | बैलपोळा – शेतकऱ्याचा सोबती असलेल्या बैलाचा सण

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे “बैलपोळा​”[Bail Pola]. बैल हा शेतकऱ्याचा सोबती आणि त्याची कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. बैलांचा हा सण श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा केला जातो. 

पोळा[Pola] या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रीतसर आमंत्रण देण्याची पद्धत असते. आज आवताण घ्या आणि उद्या जेवायला या असा आमंत्रण या बैलांना दिल जात. दुसच्या दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी  सकाळी बैलांना नदीवर नेलं जात, त्यांना अंघोळ  घातली जाते, त्यांना छान सजवलं जात म्हणजे शिंगाना रंगरंगोटी, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा घातल्या जातात.

त्यानंतर अंगावर झूल घालून त्यांना नवेद्य खायला घालतात. याशिवाय घरामध्ये मातीचे दोन बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण कला जातो. 

तसेच याच दिवशी बैलांची खांदेमळणी सुद्धा केली जाते. बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतात आणि त्यानंतर बैलांच्या खांद्यावर हळद लावली जाते. 

बैलांना यादिवशी शेतीच्या सर्व कामातून सुट्टी दिली जाते. त्यांना छान हिरवा चार दिला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. छान सजवलं जात. त्यानंर बैलाची पूजा करून ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. 

शेतकऱ्याचा सोबती असलेल्या बैलाचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 

बैलपोळा 2021 | Bail Pola Images

bail pola 2021
bail pola status
bail pola festival 2021
bail pola photo
bail pola image
bail pola wishes

बैलपोळा 2021 | Bail Pola Quotes, wishes & Shayri

गळ्यामध्ये घुंगुरमाळा, पाठीवरी झूल विराजे… बैलपोळ्याला दागिन्यांनी, माझी बैलजोडी साजे… सर्वांना बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तुझ्याविना त्याची गाडी थांबते
राब राब राबला तरी एकटा पडते
तो जरी असेल पोशिंदा जगाचा
पण त्याचे बळ तू आहेस सच्चा मित्र शेतकरी बापाचा…सर्वांना बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

वाडा शिवार सार वाडवडिलांची पुण्याई
किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई…बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

नाही दिली पुरणाची पोळी
तरी राग मनात धरणार नाही
फक्त वाचन द्या मालक मला
मी कत्तल खाण्यात मरणार नाही
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

शेतात राबणाऱ्या तुझा अंगाला
आज शांत निजुदे…
तुझा घामानं फुलणाऱ्या पिकाला
तुझा डोळ्यात सजू दे… बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आज साजरा करा बैलपोळा
सगळेच होतात भोवती गोळा…
शेतकऱ्यांच्या बैलांना आज खूपच मान
नदीवर नेवून घासून अंघोळ घालतात छान…
शिंग रंगवून झूल माळा घालून नटतात छान
नटून थाटून गावभर फिरवतात त्यांना छान…
थकून भागून घरी आल्यावर मेजवानीचा थाट
जेवायला चार नाही तर पुरणपोळीचा घाट…
महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा हा खूपच प्रमुख सण
नाहीतर वर्षभर करतात दोघेही शेतात वणवण… बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!